कर्मवीर भाऊराव पाटील



कर्मवीर भाऊराव पाटील
     
       कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. व त्यांचा मृत्यू 9 मे 1959 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. भाऊराव पाटलांच्या हातून घडलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा कार्याला जन माणसांकडून मिळालेली उत्स्फूर्त आदरांजली म्हणजे त्यांना मिळालेली कर्मवीर ही पदवी होय. पुणे विद्यापीठाने तर त्यांना डिलीट ही पदवी अर्पण केली. तर भारत सरकारने पद्मभूषण हा किताब बहाल केला. जेव्हा माणसे आणि पर्वत भेटतात तेव्हा थोर कार्ये होतात. कर्मवीरांनी जे शिक्षणाचे रोपटे लावले हे रोपटे आज वटवृक्षाच्या रूपाने आपणास पहावयास मिळते. हा वटवृक्ष म्हणजे अण्णांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था होय. एवढ्याशा रोपट्याचा वटवृक्ष होणे हे कर्मवीरांचे महान कार्य होय. अनेक शाळा महाविद्यालय  वसतिगृहे सुरु करण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात लोकशिक्षणाची विशाल चळवळ सुरू करण्यात कर्मवीरांचा थोरपणा सामावलेला आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या शोधार्थ मनमानी आणि उघड्या डोक्याने अण्णा महाराष्ट्रभर अनवाणी पायाने , आणि उघड्या डोक्याने अण्णा महाराष्ट्रभर वणवण  फिरले. हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता यावर अण्णा भर देत होते. महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटलांचे नाव अमर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...