महात्मा गांधी




राष्ट्रपिता महात्मा गांधी

             राष्ट्रपिता म्हणून संपूर्ण जगाला ज्यांची ओळख आहे असे महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. व त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. हिंदुस्थानने जगाला शांतता व समता यांचा संदेश दिला. या शांततेचा व समतेचा थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी होय. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी-अत्याचारी, जुलमी सत्तेतून रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला. परदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीनिमित्त बाहेर पडले. त्यांना इंग्रजांच्या अन्यायी जुलमी सत्तेची  प्रचंड चीड होती. भारतातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रह, व स्वदेशी चा वापर, उपोषण व हरताळ या सूत्रानुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. चले जाव चळवळ, दांडी यात्रा, आमरण उपोषण, अशा विधायक मार्गांचा वापर करून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या थोर राष्ट्रपित्याने अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासीयांना दिली. शांततेच्या मार्गाने लढा देणारा थोर महापुरुष आपल्या देशाला लाभले हे आपणा सर्व भारतीयांचे परमभाग्यच होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...