लोकमान्य टिळक


  

लोकमान्य टिळक

       भारतीय स्वातंत्र्य देवतेचा उद्गाता असलेले लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव मध्ये झाला त्यांचा  मृत्यू 1 ऑगस्ट 1920 मुंबईमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कारण या थोर महात्म्यांनी तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व सामाजिक ऐक्यासाठी जिद्दीने पाऊले उचलले. देशभक्तीच्या अलोट प्रेमापोटी स्वदेशीचा नारा देशभर पसरवला. समा जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखून केसरीमराठा यांसारखी वृत्तपत्रे सुरु केली. जहालमतवादाचे लोकमान्य टिळक नेते बनले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा प्रयत्नवादाचे जनक लोकमान्य टिळक बनले. समाज तर सुधारला पाहिजे, स्वातंत्र्य आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी अनेक प्रकारचे ध्येयवादी प्रयत्न त्यांनी केले. परकीय सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्यभर लढले. आजही आपण त्यांचे नाव अभिमानाने व गर्वाने घेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...