द ग्रेट मदर तेरेसा
द ग्रेट मदर तेरेसा यांचा जन्म 27
ऑगस्ट 1910 रोजी झाला. व त्यांचा मृत्यू 1997 मध्ये झाला. सध्याच्या काळातील एक थोर व्यक्ती, थोर समाजसेविका म्हणून मदर तेरेसा यांचा उल्लेख
करावा लागेल. गोरगरीब, अनाथ, अपंग,
अशा लोकांना आपलं समजुन जो प्रेमाने,
त्यांची सेवा करतो तोच खरा साधू होय. मदर
तेरेसा यांना खरोखरच साधू किंवा संत म्हणणे उचित ठरेल. मदर तेरेसांचा प्रथमपासूनच धार्मिकतेकडे ओढा होता. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांना ‘नन’
व्हावे असे वाटू लागले. त्यावेळी भारतात बंगालमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारा
आयरिश परिचारिकांचा एक गट काम करीत होता. त्यांच्या कार्याच्या कथा ऐकून त्या
प्रभावित झाल्या. व त्यांनी जोगिन बनण्याचा निर्णय घेतला. कलकत्ता मधील सेंट मेरी
हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी काम सुरू केले. पुढे त्या मुख्याध्यापिका
बनल्या. परंतु ज्ञानदानाच्या कामापेक्षा प्रत्यक्ष सेवा कार्यात त्यांना अधिक रस
होता. कलकत्त्याच्या मोतीझील या बकाल वस्तीत 1948 मध्ये त्यांनी गरीब मुलांसाठी पहिली आरोग्य
शाळा सुरू केली. त्यासाठी missionaries of charity
या संस्थेची स्थापना केली.
अवघ्या पाच मुलांवर शिशू भवन ही शाळा त्यांनी
सुरू केली. पुढे 1952 मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी ‘निर्मळ हृदय’ ही संस्था सुरू केली. अनाथ, निराधार, ज्यांना औषधोपचाराची खरी गरज आहे,
त्यांना ही संस्था म्हणजे घरच होते. कलकत्ता
शहर व परिसरात त्यांच्या या कार्यामुळेच त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. भारतात 1965
मध्ये शांतीसागर ही कुष्ठरोग्यांची वसाहत उभी
केली. तर 1976
मध्ये आशादान या संस्थेची स्थापना केली. पुढील
काळात त्यांनी अनाथ बालके, अपंग, अंध,
वृद्ध व निराधार, कुष्ठरोगी आधी, समाजातील दीनदुबळ्या व उपेक्षित घटकांसाठी
हजारो केंद्रे सुरू केली. भारतातच नव्हे तर जगातील विविध देशात त्यांच्या सेवा
कार्याची व्याप्ती वाढली. दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी मदर तेरेसा
आवश्यकता भासेल त्या ठिकाणी धाव घेत राहिल्या. त्यांच्या या सेवा
कार्यामुळेच जगातील महान व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला. या कार्याबद्दल
त्यांना भारत सरकारने प्रथम पद्मश्री हा किताब दिला. 1971
मध्ये जोसेफ केनेडी पारितोषिक,
नेहरू पारितोषिक, व पोल जॉन पोल यांचे शांतता पारितोषिक मिळाले.1979
मध्ये त्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले.1980
मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा
सर्वोच्च बहुमान देऊन त्यांच्या कार्याचा महान गौरव केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा