साने गुरुजी




साने गुरुजी




साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर  1899 मध्ये झाला. व त्यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरलेल्या व्यक्तींची अनेक जीवन चरित्र पाहावयास मिळतात. साने गुरुजी हे त्यामधील एक होत. ते कोकणातील वाढवली गावचे. लहानपणापासून मातृ पितृ प्रेमाने व सूसंस्काराने घडलेला साने गुरुजींचा मान पिंड अखेरपर्यंत आकर्षक ठरला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते बाहेर पडले.
समाजातील जातिभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, यांना त्यांनी तीव्र विरोध केला. खरेतर साने गुरुजी हे आधी करावे, मग सांगावे या विचारसरणीचे होते. कोणतेही काम स्वतः प्रथम करणे हा त्यांचा नित्यक्रमच होता. प्राणिमात्रांवर दया करणे, निसर्गावर प्रेम करणे, जातीभेद न मानणे, समता व बंधुता या तत्त्वांच्या प्रसारासाठी त्यांनी लिखाणाचा मार्ग स्वीकारला वेळप्रसंगी कठोरतेलाही सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.
प्रसंगी ते सोडण्यासही डगमगले नाहीत. शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, गोरगरिबांच्या, सेवेत त्यांनी आपले आयुष्य संपवले. असे थोर समाजसेवक साने गुरुजी बाल सुसंस्काराला महत्व देऊन समाज सुधारण्यासाठी अखंड आघाडीवर राहिले. ते जसे थोर देशभक्त होते तसेच महान मातृभक्त ही होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...