तालुक्याविषयी


श्रीवर्धन
श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.
        श्रीवर्धन तालुका हा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला असून तालुक्याची हद्द पूर्ण होते तेथे बाणकोटची खाडी आहे. त्या खाडी पलिकडे रत्नागिरी जिल्हयाची सुरवात होते. सदर तालुक्याची पश्चिम बाजु ही अरबी समुद्राने व्यापलेली आहे. पूर्व बाजूस म्हसळा तहसिल तर उत्तरेस तळा व मांदाडची खाडी आहे.

       मुंबईपासुन दक्षिणेस 200 कि.मी.,ठाण्यापासुन 190 कि.मी.,पुण्यापासुन 160 कि.मी.आहे .मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक166 (जुना क्रमांक 17 )वरील माणगांव शहरा पासून 45 कि.मी.अंतरावर श्रीवर्धन गाव वसलेले आहे. माणगांवपासुन मजेशीर वळणदार नागमोडी रस्त्याने प्रवास करताना पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येतो . पावसाळयात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधब्यांचा आनंद घेत श्रीवर्धन येथे पर्यटक येत असतात.
      श्रीवर्धन हे पहिले पेशवे श्री. बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान आहे. श्रीवर्धन पासुन सुमारे 19 कि.मी.अंतरावर हरिहरेश्वर हे गाव आहे. श्रीवर्धन गावात पेशवेवाडा आहे .हे एक पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
      श्रीवर्धन तालुक्यापासुन 19 कि.मी.अंतरावर हरिहरेश्वर येथे शंकराचे प्रसिध्द मंदिर असुन या मंदिरास दक्षिण काशी म्हणुनही संबोधले जाते. श्रीवर्धन पासुन उत्तरेकडे दिवेआगार येथे सुवर्ण गणेश मंदिर हे धार्मिक व पर्यटन स्थळ प्रसिध्द आहेत. .या तिन्ही ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. श्रीवर्धन तालुका भौगोलिक विविधतेने नटलेला आहे.या भागात उत्तुंग असे
डोंगर द-याही आहेत व समुद्र किनाराही आहे.


श्रीवर्धन
जिल्हा
रायगड
राज्य
महाराष्ट्र
लोकसंख्या
२२०७५
(२०११)
वाहन संकेतांक
MH ०६

इतिहास
श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्वाचे बंदर होते.
सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते.
श्री.बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते.
धार्मिक स्थळे[संपादन]
श्री. लक्ष्मीनारायण मंदिर
श्रीवर्धन मध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फुट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी. दगडाच्या झीलईमुळे ती चकचकीत दिसते.अतिशय रेखीव प्रमाणबध्द असलेल्या या मूर्तीच्य उजव्या पायाशी विष्णूवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूंस उभे आहेत. प्रभावळीवर कीर्तीमुखाच्या दोन्ही बाजूंस दशावतार कोरलेले आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्म, चक्र, गदा, शंख) ही मुर्ती श्रीधराची ठरते. परंतु सोबत लक्ष्मी असल्यामुळे कदाचित लक्ष्मीनारायण संबोधले जात असावे. गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम, मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम, आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराकडून दुसरा चौकोनी वाश्यावर एक काष्ठलेख नजरेस पडतो. देवनागरी लिपीतील हा मजकूर आपल्याला सहज वाचता येतो. यावरुन 29 मार्च 1775 या दिवशी मंदिराचा जीर्णोध्दार झाला हे समजते. मंदिराच्या पाठीमागच्या भींतीवर आजही पेशवे घराण्यातील रोजच्या प्रार्थनेत म्हटला जाणारा श्र्लोक आहे. मंदिराच्यासमोरच छोट्या घुमटीत गरुडमुर्ती आहे तर शेजारी मारुती मंदिर आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...