DIKSHA APP बाबत

आपले शिक्षक आपले हिरो !

      आपल्या महाराष्ट्रात आपली मूलं शिकावी म्हणून सतत काम करत असणारा , आपली शाळा आणि त्या शाळेत आपले कर्तव्य पार पाडणारा आपला शिक्षक! या शिक्षकांमुळे आपला समाज सुशिक्षित होत आहे.आज हा आपला शिक्षक एवढे प्रयत्न करत आहे .का ?कशासाठी? तर माझा विद्यार्थी शिकला पाहिजे समाजाला एक सुशिक्षित,विवेकी नागरिक आणि देशासाठी एक सुजाण ,राष्ट्राभिमानी नागरिक  मिळावा म्हणून ! सगळी तडजोड वर्गात करत बसणारा हा एक शिक्षक म्हणून मला ही संकल्पना चांगली वाटली "आपले शिक्षक आपले हिरो".आजचा हा शिक्षक  मुलांना फक्त पुस्तकातील शिक्षण देत नाही ,तर त्याने आपली शिकवण्याची पारंपारिक पद्धत बदलून नवीन  शैक्षणिक तंत्रांचा,साधनांचा व अध्यापनाच्या पद्धतींचा अवलंब केला आहे, ते का बरे ?
   ते फक्त या साठीच कीआजचा भारतीय विद्यार्थी सुद्धा जगाच्या सोबत शिक्षण क्षेत्रात पुढे असला पाहिजे ,पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला एका शिक्षकाने Q.R code ची संकल्पना दिली तर आता सर्व पुस्तकात Q.R code आलेत आणि पुस्तक सुद्धा आमच्या ह्या हिरो सारखाच digital होऊन दीक्षा app च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर पसरले आहे. ह्याला प्रत्येक शिक्षक ,विद्यार्थीच नव्हे तर पालक सुद्धा वापरत आहेत. ह्यात अनोखी बाब म्हणजे काय तर दीक्षा मध्ये आलेला सर्व deta/content ते आमच्या तुमच्या सारख्या ह्या शिक्षकानेच तयार केलेला आहे ,म्हणून मला ही संकल्पना खूप आवडली आमचे शिक्षक आपले हिरो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...